भारत बंदमध्ये व्यापारी होणार सहभागी; उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठ राहणार बंद

रत्नागिरी:- लखीमपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीने महाराष्ट्र बंद घोषित केला आहे. विविध राजकीय पक्षांनी व्यापारी संघटनेकडे व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याबाबत आवाहन केले होते. या बंदत रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापारी सहभागी होणार आहेत. सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. 

आधीच कोरोना परिस्थितीमुळे व्यापारी संकटात असल्याने व्यापारी बंदच्या विरोधात होते. मात्र कोणतीही भूमिका न ताणता यामध्ये रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने व चिपळूण व्यापारी संघटनेने सुवर्णमध्य काढीत उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. उद्या दुपारी 1 नंतर मात्र सर्व बाजारपेठ सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी दिली आहे.