नवी दिल्ली:- भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोर आणि सियालकोटवर क्षेपणास्त्र डागली आहेत.
सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी अंधार पडताच पाकिस्तानने सीमेजवळील भारतातील विविध शहरांमध्ये 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानने फक्त राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 70 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच हामून पाडली.
मीडिया रिपोर्सनुसार, प्रत्युत्तरात भारताने लाहोरमध्ये असलेले पाकिस्तानचे AWACS (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम) नष्ट केले आहे. याशिवाय भारताने पाकिस्तानच्या फैसलाबाद, सरगोधा, मुलतान आणि सियालकोट शहरांमधील संरक्षण प्रणालीदेखील नष्ट केली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या सर्व संरक्षण यंत्रणा सध्या पूर्णपणे सक्रिय असून, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पाकिस्तानची 3 विमाने पाडली, पायलट ताब्यात
पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने पाकची 3 लढाऊ विमाने पाडली. भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये दोन JF-17 आणि एक F-16 यांचा समावेश आहे. तसेच, यापैकी एका विमानातील पाकिस्तानी वैमानिकाला पकडण्यात आल्याची माहितीही मिळत आहे.
पाकिस्तानचे ‘या’ अकरा शहरावर हल्ले अयशस्वी
जम्मू, आरएस, पुरा, सांबा, अर्निया, अखनूर, तंगधार, केरन, कर्णह, पठाणकोट, पोखरण, जैसलमेर, या सर्व क्षेत्रांमध्ये पाकने हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण ब्लॅकआउट करून भारतातर्फे जलद लष्करी कारवाई करण्यात आली.
भारताचा प्रत्युत्तरात या शहरावर हल्ले!
पाकिस्तानने भारतावर हल्ल्यावर हल्ले सुरु केले पण त्याचा बिमोड भारतीय लष्कराने केला. एका रात्रीतच भारताने पाकिस्तानला आपले लष्करी सामर्थ्य दाखवले. भारताने लाहोरजवळील पाकिस्तानी हवाई तळांवर प्रत्युत्तर हल्ला केला. पीओकेमध्ये 3 दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले, यासह लाहोरची हवाई संरक्षण यंत्रणा देखील नष्ट झाली.
कराची बंदरावर हल्ला
भारतीय नौसेनेनेही पाकिस्तानच्या कराची बंदराला नेस्तनाबूत केले. जेथुन हल्ला करणार आणि ज्या यंत्रणेचा वापर करणार त्यावरच भारताने थेट हल्ला चढवला. भारतीय विक्रांतने पाकिस्तानला लष्करी सामर्थ्य दाखवत सागरी क्षेत्रातही आपले वर्चस्व असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. आता भारताचे पुढचे टार्गेट रावळपिंडी असल्याचेही वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.