भातगाव येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- छातीत दुखू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गुहागर तालुक्यातील प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनंत विठ्ठल वीर (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते भातगाव-गोळेवाडी, ता. गुहागर येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास अनंत वीर यांच्या छातीत अचानक दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सकाळी ११:५१ वाजताच्या सुमारास त्यांना रुग्णालयातील आयसीयू विभागात दाखल करून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बगड यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

​या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी १७:२५ वाजता या घटनेबाबत अकस्मात मृत्यू क्रमांक ०७/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.