भाट्ये येथे प्रवासी शेडचा भाग कोसळून दोघे जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील भाट्ये दर्गा स्टॉप येथे प्रवासी शेडचा काही भाग शुक्रवारी संध्याकाळी कोसळला. त्यामुळे रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील आनंद पेडणेकर व त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला.

श्री. पेडणेकर आपल्या मुलासह स्कूटरने जात असताना स्कूटर पंक्चर झाल्याने ते निवारा शेडजवळ थांबले. त्यावेळी अचानक या प्रवासी शेडच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामुळे त्यांना व त्यांच्या मुलाला पायाला मार लागला आहे. या धोकादायक शेडची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.