भाट्ये झरीविनायक येथे उभ्या सीएनजी ओम्नीने घेतला अचानक पेट

रत्नागिरी:- शहरानजिकच्या भाट्ये झरीविनायक येथे उभ्या असलेल्या सीएनजी ओम्नीने अचानक पेट घेतला. आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले असून ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली.

याबाबत गाडी मालक अमन शेखासन (रा. धनजी नाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार,शेखासन यांनी त्यांची ओम्नी गाडी बंद पडल्याने भाटये येथे गेले तीन महिने उभी करून ठेवलेली होती. गुरुवारी सायंकाळी गाडीने अचानकपणे पेट घेतला. यात गाडीच्या आतील आणि बाहेरील भाग जळून मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल बेंदरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.