रत्नागिरी:- शहरालगतच्या भाट्ये खोतवाडी येथे किरकोळ वादातून पत्नीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 16 जुलै 2023 रोजी रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी पत्नीने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला संतोष शांताराम हरमले (रा भाट्ये खोतवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी संतोष हरमले व त्याच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला याचा रागातून संतोष याने कोंबडी कापण्याच्या साकट्याने पत्नीला मारहाण केली मारहाणीत पत्नीच्या डोळ्यांना दुखापत झाली असून दोन्ही डोळ्यांनी दिसण्यात दोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष याच्याविरूद्ध भादंवि कलम 324,323 प्रमाणे गुन्हा दाखल केला.









