रत्नागिरी:- भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदर हे गाळाने भरल्याने मच्छिमारांचा समुद्रात ये-जा करण्याचा मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. या खाडीच्या मुखातील गाळ ३१ डिसेंबरपर्यंत उपसा न झाल्यास जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीने उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला गांभीर्य राहिलेले नसल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाची समस्या गेल्या कित्येक . याबाबत गेली १० ते १५ वर्षांपासून निवेदने देऊनही त्याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.
वर्षांपासून मच्छिमारांना भेडसावत आहे मांडवी बंदराच्या मुखाशी असलेल्या गाळामुळे मच्छिमारांच्या बोटींना अपघात झालेले आहेत त्यामुळे काही मच्छिमारांना जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे भाट्ये खाडीच्या परिसरातील राजिवडा, कर्ता, भाटो, फणसोप आदि गावातील मच्छिमारांना एकत्रित करुन राजिवडा कोअर कमिटीने मच्छिमार संघर्ष समितीची स्थापना केली. गावाची समस्या सोडवण्याबाबत शासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली अनेकदा लोकप्रतिनिधी, मंत्री आणि लोकप्रतिनिधीं, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडवी बंदरातील गाळाबाबत तसेच मच्छिमारांच्या समस्या मांडल्या मात्र, गाळ उपसाबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्यात आली. त्यामुळे मच्छिमारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मच्छिमारांनी ३१ डिसेंबरपर्यंत गाळ उपसा न झाल्यास त्यानंतर उपोषण करण्याचा निर्णय मच्छिमारांनी केला घेतला आहे. मच्छिमार संघर्ष समितीच्या पदाधिकारी गेले काही महिने लोक प्रतिनिधींसमोर मच्छिमारांच्या समस्या मांडल्या तसेच गाळ उपसण्याची मागणी केली मात्र, मच्छिमारांच्या या गाळाच्या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत मच्छिमारांनी अनेकदा निवेदनेही प्रशासनाला दिली याकडे गांभियनि न पाहता प्रशासनाने त्या निवेदनाबाबत मच्छिमार संघर्ष समितीशी साधा पत्रव्यवहार करण्याची तसदीही प्रशासनाने केलेली नाही. त्यांनी दिलेली निवेदने धूळधात पडली आहेत याबाबत मच्छिमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.









