भाट्ये अपघात प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील भाट्ये-चेकपोस्ट येथील रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास भाट्ये चेकपोस्ट रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संदिप मधुकर भायजे (वय ४४, रा. भाट्ये टाकळेवाडी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार मृत महेश अनंत पिलणकर (वय ४८, रा. फणसोप, टाकळेवाडी, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एयु ३३४०) ही घेऊन भाट्येहून रत्नागिरीकडे जात होते. भाट्ये चेकपोस्ट येथे आले असता समोर ट्रक (क्र. एमएच-१३ डी क्यू ८७१६) वरिल वाहन चालकाने पाठीमागून मृत महेश पिलणकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये महेश च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालकाने अपघाताची खबर न देता पलायन केले. या प्रकरणी संदिप भायजे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.