रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी मांडवी मुखाजवळ समुद्राच्या पाण्यात बोट बुडून उवेस अंजुम मक्की (21,रा.जयगड) या खलाशाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोट तोंडी कराराने घेतलेल्या खलील अयुब सोलकर (36) आणि मुख्य तांडेल फहिम फाईक शेख (19,दोन्ही रा.जयगड,रत्नागिरी) या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खलील सोलकर यांनी बोटीचे मुळ मालक इम्रान सोलकर यांच्याकडून परवाना नसलेली बोट तोंडी कराराने ताब्यात घेतलेली होती.ती बोट समुद्रात चालवण्यायोग्य आहे कि नाही याची खात्री न करता बोट चालवण्याचा अनुभव असूनही प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता 21 ऑगस्ट रोजी मुख्य तांडेल फहिम शेख हे आपल्या सोबत दुय्यम तांडेल आफशान मुजावर,खलाशी अय्याज माखजनकर,हुजेफा मुल्ला आणि उवेश मक्की यांना सोबत घेउन निष्काळजीपणे समुद्रात गेले होते.दरम्यान,बोट राजीवडा खाडीतून समुद्रात नेत असताना मांडवी मुखाजवळ समुद्रातील उंच लाटांमुळे अपघात होउन बोट समुद्रात बुडाली होती.त्यावेळी बोटीतील उवेस मुक्कीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.