रत्नागिरी:- अस्वस्थ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. मनिषा मारुती जोशी (वय ६९, रा. भाटीमिऱ्या, दत्तमंदिरजवळ, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनिषा या दुपारी आदिष्ठी नगर, मजगाव रोड येथील त्यांची मुलगी सेजल राकेश चव्हाण यांच्या रहाण्यास गेल्या होत्या दुपारी जेवण केल्यानंतर तीन च्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.