रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे विल्ये (आवळीची मोडा) येथे असलेल्या अंकुश शितप यांच्या काजूच्या बागेला आग लागून त्यामध्ये झाडे जळून गेल्याने १ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी चौघांविराधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केलेल्या चौघांमध्ये विष्णू पानगले, सुरेखा पानगले, यशवंत पानगले, नंदिता पानगले यांचा समावेश आहे. यातील आरोपी आपल्या शेतीची भाजावळ करताना शेजारी असलेल्या बागेला आग लागून वणवा लागू शकतो, याची कल्पना असतानादेखील त्यांनी भाजावळीसाठी आग लावली. त्यामुळे अंकुश शितप यांच्या बागेला आग लागून त्यामध्ये त्यांच्या बागेतील काजूची ६५० झाडे, ३० ते ३५ हापूस आंबा तसेच काढून ठेवलेल्या गवताच्या वरंड्या जळून गेल्याने १ लाख ९२ हजारचे नुकसान झाले.