रत्नागिरी:- भाजपचे उत्तर तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांच्या वाढ दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भाजप वाटद जिल्हा परिषद गट आणि लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी रोजी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
भाजप तालुकाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्या पासून विवेक सुर्वे यांनी उत्तर रत्नागिरीमध्ये भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या वाढ दिनानिमित्त अशाच एका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी रोजी वाटद खंडाळा येथील भाजपच्या कार्यालयामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा नेते तथा माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे निखिल बोरकर यांनी सांगितले. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत चष्मे देखील बनवून मिळणार आहेत. तसेच तपासणीअंती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेचे निदान झाल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील करून मिळणार आहे. तरी वाटद जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांनी या शिबिराचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी निखिल बोरकर 9422750907, अमोल बैकर 8975412338, अमित गडदे 7875959343 यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.