भाजपने कोकणातून धनुष्यबाण गायब केला: उद्धव ठाकरे

रत्नागिरीः– कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खरे तर येथे प्रचार करायला यायची आवश्यकता नव्हती. गद्दारांनी शिवसेना फोडली, पक्ष चोरला, धनुष्यबाणही चोरला. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपवाल्यांनी गद्दारांच्या जागा कापल्या, उमेदवार बदलले, खोक्यात अडकलेल्यां गद्दारांना भाजपवाल्यांनी कोकणातून धनुष्यबाण केव्हा गायब केला हे समजलेच नाही. भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेशी असलेले कोकणचे नाते तोडायचे होते, परंतु त्यांचे हे स्वप्न कोकणातील प्रामाणिक शिवसैनिक कधीही यशस्वी होऊ देणार नाही. खासदार विनायक राऊत यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. कोकणात गुंडांचे राज्य आणायचे नसेल तर विनायक राऊत यांना विजयी करा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर प्रचार सभेत केले.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या जाहीर प्रचारासाठी श्री. ठाकरे रत्नागिरीत आले होते. यावेळी साळवी स्टॉप येथील जाहीर सभेत त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी शिवसे- ना नेते आमदार भास्करशेठ जाधव , आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, युवा सेनेचे सरचिटणीस वरून सरदेसाई, मिलिंद

नार्वेकर, लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी. श्री. शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, विधानसभा क्षेत्र संघ प्रमोद शेरे, युवा नेत्या रुची राऊत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, काँग्रेसचे नेते रमेश कीर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मूर्तुझा, यांच्यासह आप

पक्षाचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना विजयी करण्याचे आवाहन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महाविकास आघाडीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, होता व राहील. कोकणातील जनता माझ्या कुटुंबातील आहे. त्यामुळे मला येथे प्रचाराला येण्याची आवश्यकता नव्हती परंतु मी माझ्या कुटुंबातील लोकांना भेटायला आलो आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु माझा कोकणी शिवसैनिक आज- ाही जागेवरच आहे. शिंदे यांनी गद्दारी करत पक्ष फोडला परंतु आज त्यांची अवस्था काय झाली आहे? त्यांच्या जागा कापल्या गेल्या, उमेदवार बदलले गेले तर ज्या धनुष्यबाणासाठी आपण गद्दारी केल्याचे शिंदे सांगत होते, तोच धनुष्यबाण भाजपवाल्यांनी कोकणातून गायब केलाआहे. परंतु खोक्यात बसलेल्यांना ते कळले नाही. असा टोला श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकारी मंत्र्यांना लग्-गावला.

सत्ता दिसेल तो पक्ष पकडायचा अशांना भाजपने रत्नागिरीतून उमेदवारी दिली आहे. लघु व सूक्ष्म खात्याचा कार्यभार केंद्रात सांभाळणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणात एक तरी लघु किंवा सूक्ष्म कारखाना आणला का? आता प्रश्न उपस्थित करत या निवडणुकीत ज- नता त्यांना अतिसूक्ष्म करणार आहे. या निवडणुकीत गद्दारांना जनता धडा शिकवेल असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. कोकण सुसंस्कृत आहे कोकणात गुंडाराज चालत नाही. तुम्हाला पुन्हा गुंडाराज हवे आहे का? असे विचारत केंद्रात सत्ता आल्यानंतर बारसू, जैतापूर प्रकल्प कायमस्वरुपी हद्दपार करण्याची घोषणा श्री. ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप ही दहशतवाद्यांची टोळी आहे. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या माध्यमातून जनतेवर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. यांचा घटना बदलण्याचा यांचा डाव असून तो आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही. काँग्रेसने ६० वर्षात जे कमावले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षात कमावले आहे. हे केवळ थापा व आश्वासने देतात. मोदीची गॅरंटी फसवी आहे. आता त्यांचा प्रचार म्हणजे ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा’ असा असून मागील लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास आता पूर्णतः कमी झाला आहे. आता ४०० पार नव्हे तर यांना तडीपार करण्याची वेळ आली आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोकण धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सुटाबुटातील ठेकेदारांच्या ताब्यात सिडकोच्या माध्यमातून कोकण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार आल्यानंतर सर्व निर्णय रद्द केले जातील. देशावरील हुकुमशाही टाळण्यासाठी देशात आपले सरकार आणायचे आहे. त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवून हॅट्रिक करा असे आवाहन श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. श्री. उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसेना नेते भास्करशेठ जाधव, खासदार विनायक राऊत यांनीकेंद्र व राज्य सरकारवर टीका करत यावेळी पुन्हा मशाल चिन्हाचा उमेदवार लोकसभेत पाठवा असे आवाहन केले.