रत्नागिरी:- भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सहा जणांच्या यादीत चार जुन्या नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. तर दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपाचे अनुभवी नगरसेवक मुन्ना चवंडे यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही.
भाजपने जाहीर केलेल्या सहा जणांच्या यादीत मानसी करमरकर, वर्षा ढेकणे, राजेश तोडणकर, नितिन जाधव, समिर तिवरेकर, आणि सुप्रिया रसाळ यांना नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.









