रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील परटवणे शिरगांव गणपतीपुळे मार्गावरील गांजुर्डे येथील मशीदिजवळ भलेमोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने शिरगांव.साखरतर आणि गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भलेमोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक जवळपास १ तासापेक्षा अधिक काळ ठप्प झाली होती. १ तासाच्या प्रयत्नानंतर शिरगाव ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी झाड तोडून बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. या वेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मात्र कुठे दिसुन न आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली