चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ ग्रामपंचायतसमोर ०२ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक गंभीर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ‘बडा दोस्त’ टेम्पोने मागून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
या अपघाताची तक्रार दुचाकीस्वार रवींद्र कृष्णा महाडीक (५६, रा. कामथे, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी दाखल केली आहे. त्यानुसार, टेम्पो चालक ऋषिकेश अनिल राणे (विक्रोळी पूर्व, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.