भरणे नाका येथे ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी

खेड:- खेड तालुक्यातील व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग क्रमांक 66 वरील भरणा नाका येथील नवभारत हायस्कूल समोर अज्ञात ट्रकने शालेय विद्यार्थिनीला  धडक  दिल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ कळबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी घडला. 

जखमी  शालेय विद्यार्थिनी कु. चैताली संजय मन्ना (वय-17) प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी  येथे दाखल केले. येथील वैद्यकीय अधिका-यांनी तातडीने जखमीवर औषधोपचार सुरू केले असून जखमी विद्यार्थिनीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. अपघाताची नोंद येथील रात्री वाजेपर्यंत झाली कि नाही. याची माहीती प्राप्त झाली नाही. पण ट्रक चालक अपघातस्थळावरून पसार झाल्याचे समजते. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.