रत्नागिरी:- रत्नागिरीत शिवसेना(उद्धव ठाकरे)पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत आली असून शहरात मोकाट जनावरे व भटकी कुत्री यांचा उपद्रव तात्काळ थांबवा, तसेच शहरातील खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजवावे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराचा शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिला आहे.
रत्नागिरी शहरात रस्ते, मोकाट जनावरे, भटकी कुत्री या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. या पारश्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मोकाट जनावरे, भटकी कुत्री, आणि शहरातील खड्डे याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
यावेळी मुख्याधिकारी बाबर यांनी सांगितले की, उद्या बुधवारपासून मोकाट गुरांचा बंदोबस्त केला जाईल. गणेश उत्सवापूर्वी खड्डे बुजविले जातील असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
यावेळी शिवसेना समन्वयक संजय पूनसकर उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे शहर संघटक तथा युवा सेना तालुका अधिकारी प्रसाद सावंत उपशहरप्रमुख नितीन तळेकर श्रीकृष्ण चव्हाण महिला उपजिल्हाप्रमुख संध्याताई कोसुमकर महिला शहरप्रमुख मनीषा बामणे अल्पसंख्याक शहरप्रमुख जकी खान महिला उपशहरप्रमुख उन्नती कोळेकर युवासेना शहरअधिकारी आशिष चव्हाण विभागप्रमुख राजन शेटे सलील डाफळे संदेश भिसे अमित खडसोडे शकील मालदार आदि उपस्थिती होते.