भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा प्रगती भोसले

रत्नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा चार्ज पुन्हा तत्कालीन सरपंच सौ. प्रगती प्रमोद भोसले यांच्या हाती पुन्हा सुपुर्द करण्यात आला आहे. राजकीय विरोधकांच्या तक्रारीवरून सरपंचपदाच्या कामात कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत कोकण आयुक्त यांनी भगवतीनगरच्या सरपंच प्रगती भोसले यांना पदावरून काढून टाकले होते.त्यानंतर सरपंच पदाचा चार्ज उपसरपंच सौ. श्रेया श्रीकांत राजवाडकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच कडे केलेल्या अपिलामध्ये पहिल्याच तारखेला कोकण आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती आदेश मिळाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांनी सरपंच पदाचा कार्यभार पुन्हा सौ प्रगती भोसले यांचेकडे सुपूर्द केला.

याबाबतचे निकालपत्र भोसले यांनी यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे सादर केले होते. मात्र कोकण आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदकडे कोणतेही तसे पत्र न आल्याने सदरचा कार्यभार कोकण आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आज सौ प्रगती भोसले यांना देण्यात आला. यावेळी सरपंचपदाचा चार्ज पुन्हा हाती घेता घेताना गावातील बहुसंख्य ग्रामस्थ तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते. या सर्वांनी सरपंच भोसले यांचे जंगी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला करण्यात आला.

सरपंचपदाचा चार्ज पुन्हा हाती घेऊन गावातील रखडलेली सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे सौ. भोसले यांनी सांगितले. तसेच आपल्या विरोधात सूडबुद्धीने केलेल्या तक्रारींना कायद्याने आपण योग्य उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण आज या खुर्चीत पुन्हा बसलो असल्याचे सरपंच सौ. भोसले यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख श्री. प्रकाश जाधव, कोतवडे विभाग प्रमुख श्री उत्तम मोरे, उपविभाग प्रमुख गजानन गिडये, सहकार सेना उपजिल्हाप्रमुख श्री.प्रवीण साळवी, युवासेना तालुका समन्वयक श्री. साईनाथ प्रकाश जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख श्री. रोहित साळवी,श्री. प्रमोद भोसले. श्री. नंदकुमार डिंगणकर,भगवतीनगर शाखाप्रमुख श्री.प्रशांत भुते, शाखाप्रमुख वसंत घाणेकर, शाखाप्रमुख अनिल भोजे, श्री.विश्वनाथ निवेंडकर, श्री. सत्यविजय गोणबरे, सामाजिक कार्यकर्ते श्री.वैभव घाग, श्री दीपक आग्रे, श्री. विद्याधर डिंगणकर,श्री.प्रकाश भोसले. मालगुंड उपशाखाप्रमुख श्री.दशरथ साळवी तसेच निवेंडी गावातून प्रतिष्ठित व्यक्ती तसेच मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.