रत्नागिरी:- रत्नागिरीत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारपुळे- मालगुंड दरम्यान असणाऱ्या पुला वरून पाणी वाहत असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कासे- पुर्ये तर्फे सावर्डे रस्त्यावर दरड कोसळली आहे. बस वाहतूक थांबवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.