बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण:- चिपळूण शहरातील नगरपालिका इमारतीसमोर शुक्रवार ११ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १.५० वाजता एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सचिन दत्ताराम कांबळे (४७ वर्षे, रा. खेड बावशेवाडी, ता. चिपळण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.