रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात नाचणे परिसरात राहणाऱ्या वकिलाची पत्नी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या विवाहितेची दुचाकी आंजणारी पुलावर मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येच्या संशयावरून पोलिसांनी आंजणारी नदीत शोध मोहीम राबवली मात्र हाती काहीच लागले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एड.योगेश गजानन चंदगडकर ( वय-३४,रा. सोहम वैभव,सहकार नगर,नाचणे रोड) यांनी त्याबाबतची तक्रार दिली आहे. योगेश यांची पत्नीसायली योगेश चंदगडकर हि १८ ओगस्ट रोजी राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली.त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र थांगपत्ता लागला नाही.अखेरीस पती योगेश यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दिली आहे.
याप्रकरणी शोध सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी सायली यांची दुचाकी मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्त्याती आंजणारी पुलावर मिळून आली.हि माहिती मिळताच डीवायएसपी गणेश इंगळे,शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड,शहर पोलिसांचे एक पथक व लांजा पोलीस घटनास्थळी गेले होते. पुलानजीक दुचाकी सापडल्याने सायलीयांच्या आत्महत्येचा संशय बळावल्याने पोलिसांनी आंजणारी नदीत बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली. मात्र पुढील धागेदोरे काहीच हाती लागल्रे नाहीत.
दरम्यान घरातून बेपत्ता झालेल्या सायली यांची दुचाकी आंजणारी पुलावर कशी गेली? असा सवाल उपस्थित होत असून त्यादृष्टीने पोलीस तपास सुरु आहे.याबात कोणाला काही माहिती मिळाल्यास शहर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी केले आहे.








