बेकायदेशीर दारू बाळगल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील भाटकरकोंड फाट्याजवळ बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची 410 रुपयांची 8 लिटर दारु विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एकविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी 10.45 वा.सुमारास करण्यात आली.

विरेंद्र विजय सुर्वे (45,रा. तोणदे बागपाटोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल संतोष भिकाजी कांबळे यांनी तक्रार दिली होती.त्यानूसार,भाटकरकोंड येथे बेकायदा दारु विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.त्याआधारे ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.