बुद्धविहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध समाजाचा एल्गार  

थिबा राजा कालीन बुद्धविहार संघर्ष समितीकडून आयोजन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील थिबा कालीन बुध्द विहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध जनतेकडून सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आल़ा यावेळी बौद्धविहारासाठी  आरक्षित ठेवलेल्या जागेत प्रशासनाच्या वतीने होऊ घातलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम प्रक्रिया रद्द कराव़ी तसेच ती जागा बौध्द समाजाला मिळावी अशी मागणी करण्यात आल़ी तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आरपारची लढाई आंबेडकरी जनता लढेल असा इशारा देखील देण्यात आल़ा यासंबंधीचे निवेदन मार्चानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना देण्यात आल़े.

थिबा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने या बुद्धविहाराच्या बचावासाठी मार्चाचे आयोजन करण्यात आले होत़े रत्नागिरी तालुक्यातील आंबेडकरी जनतेकडून मोठा प्रतिसाद या मोर्चाला लाभल़ा 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता थिबा कालीन बुद्धविहाराच्या जागेत त्रिसरण पंचशील  घेवून मार्चाला सुरुवात करण्यात आल़ी यावेळी भंत्ते सुमेधबोधी व भिक्खूगण  उपस्थित होत़े त्याचसोबत संघर्ष समितीचे अध्यक्ष एल़ व्ह़ी पवार व कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, रत्नदीप कांबळे, प्रकाश पवार, दीपक जाधव व बौद्ध जनता उपस्थित होत़ी  

थिबा कालीन बुद्धविहार येथून मोर्चा जेलरोड मार्गे ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथे आल़ा यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आल़े तसेच जोरदार घोषणा यावेळी आंबेडकरी जनतेकडून देण्यात आल्य़ा यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मार्चाला विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केल़े समितीचे अध्यक्ष एल़ व्ह़ी पवार यांनी सांगितले की, आरक्षित जागेत होवू घातलेले कम्युनिटी सेंटर हेच बुध्दविहार आहे असे संबोधून बौध्द समाजाची प्रशासनाकडून दिशाभूल केली जात आह़े पूर्वी पालकमंत्री यांनी बुद्धविहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात दिली जाईल असे सांगितले होत़े मात्र आता ते शासनाची जमीन शासनाच्याच ताब्यात राहतील असे सांगत आह़े ही आंबेडकरी जनतेची फसवणुक आह़े त्यापासून आपण सावध राहिले पाहिज़े आज हा मोर्चा तालुक्याचा निघाला आहे, उद्या जिह्याचा निघेल व गरज पडली तर राज्याचा व देशपातळीवर मोर्चाचे स्वरुप नेले जाईल असा इशारा पवार यांनी दिल़ा  

कार्याध्यक्ष सावंत यांनी सांगितले की, थिबाराजा कालीन बुध्दविहार इंग्रज सरकारने थिबाराजा यांच्यासाठी त्यांचे इच्छेनुसार बांधून दिले होते. त्यावेळेपासून रत्नागिरी ही बौध्द संस्कृतीने पवित्र झालेली भुमी आहे. बुध्द विहाराची जागा ही एका विशिष्ठ कारणासाठी राखीव असून त्या जागेत बुध्द विहार अस्तित्वात आह़े याची पूर्ण जाणीव असतानाही त्या जागेत कम्युनिटी सेंटर बांधण्यात येत आह़े अशा प्रकारे आरक्षित क्षेत्रामध्ये कम्युनिटी सेंटर बांधण्यास दिलेली परवानगी म्हणजेच बौध्द समाजावर केलेला अन्याय आहे असे सावंत यांनी सागितल़े यावेळी बोलताना सल्लगार प्रकाश पवार यांनी सांगितले की, सुरुवातीला ट्रस्टकडून संबंधित जागेवर बुद्धविहार होणार असल्याचे सांगण्यात आले होत़े त्यानुसार आपण सर्व त्याठिकाणी उपस्थित राहिलो होत़े मात्र सहा महिन्यानंतर प्रशासनाने त्याठिकाणी कम्युनीटीसेंटर होणार असल्याचे सांगितल़े ही एकप्रकार फसवणूक ट्रस्टच्या लोकांकडून करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितल़े  

  तर भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदीप कांबळे यांनी सांगितले की, थिबा कालीन बुद्धविहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी बौद्ध  समाजाकडून लढल्या गेलेल्या 1998 पासूनच्या लढय़ाचा मी साक्षिदार आह़े आमच्या पुर्वजांनी या जागेचे जतन केले होते तसेच त्याठिकाणी पूजापाठ घेण्यात येत होत़ा मात्र शासनाने ही जागा स्वतच्या ताब्यात घेतले असून कम्युनीटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आह़े हे समाजाला कदापी मान्य होणारे नाह़ी समाजाला देण्यात आलेली जागा समाजाच्या ताब्यातच शासनाने द्यावी असे रत्नदीप कांबळे यांनी सांगितल़े  

 समितीचे उपाध्यक्ष प्रकाश प्रवार यांनी सांगितले की, समाजातील लोकांना हाताशी घरुन काही लोक समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत़ समाजात काही दलाल थिबा राजा कालीन बुद्धविहाराची जागा शासनाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत आहेत़ मात्र आंबेडकरी जनता त्यांचे मनसुबे कधीच सफल होवू देणार नाह़ी असे पवार यांनी सांगितल़े सल्लागार दीपक जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ट्रस्टच्या लोकांना अनेकवेळा चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले होत़े मात्र ट्रस्टचे लोक उपस्थित राहिले नाहीत़ सुरुवातीला ज्यांनी जागेची मागणी केली त्यांचा विचार न करता 2023 मध्ये ट्रस्टला जागा देण्यात आली व त्याठिकाणी कम्युनीटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला जात आह़े हे समाजाला मान्य होणारे नाही असे जाधव यांनी सांगितल़े यावेळी सचिव अमोल जाधव, भंन्ते सुमेधबोधी आदींनी देखील उपस्थितांना संबोधित केल़े  


माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष कीर यांचा पाठिंबा
बौद्ध समाजाकडून विहार बचावासाठी काढण्यात आलेल्या मार्चाला माजी आमदार व शिवसेना उबाठाचे उपनेते बाळ माने व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उपस्थिती लावल़ी यावेळी माने यांनी पालकमंत्री उदय सामंत हे जनतेची दिशाभूल करत आहेत तसेच समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टिका माने यांनी केल़ी तसेच विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल़े तर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी देखील राष्ट्रवादी पक्षाकडून पाठिंबा जाहीर केल़ा