बाप्पाची स्वारी, भक्तांच्या घरी!

एक दिवस आधीच गणरायाचे आगमन, आज प्रतिष्ठापना

रत्नागिरी:- आज प्रत्येक गणेशभक्तांया मनातील एक मंगलमय सोहळा म्हणून सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह संचारला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया‘च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात बाप्पाचं आगमना नादाया गजरात लहानग्यांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वांया लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन मंगळपासूना सुरू झाले आहे. आता खऱया अर्थाने मिरवणुका काढून बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. जिल्ह्य़ात रत्नागिरी जिह्यात आज बुधवारी 1 लाख 69 हजार 552 गणेशमूर्तींची घरोघरी, सार्वजनिक मंडळस्तरावर प्रतिष्ठापना होणार आहे.

रत्नागिरीमध्ये गणरायाया स्वागतासाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आराध्यदैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची तयारी जवळजवळ पूर्णत्वाला गेलेली आहे. गणेश भक्तांकडून घरोघरी, तसा सार्वजनिक मंडळांमार्फत आकर्षक देखावे आणि रोषणाई करून बाप्पाचं स्वागत केलं जाणार आहे. त्या स्वागता सर्वत्र जोरदार माहोल झालेला आहे. सारे भक्तगण बाप्पाचे आगमन आणि त्याच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी दंग झालेले आहेत. रत्नागिरीत गणेश चित्रशाळांमधून लाडक्या गणपती बाप्पाला नेण्याकरिता साऱया भक्तांची जोरदार लगबग सुरू आहे.

यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर दिला जात आहे. शाडूच्या मातीच्या मूर्तींची स्थापना केली असून, पर्यावरणपूरक सजावटीलाही गणेशभक्तांकडून पसंती दिली जात आहे. पुढील दहा दिवस या उत्सवाया भक्तीमय वातावरणाला उधाण येणार आहे. जिह्यात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. बाप्पाच्या आगमनाचा हा उत्सव यावर्षी मोठय़ा धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण आतुर झालेला आहे.

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशी, म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी बाप्पाच्या निरोपाने संपणार आहे. जिल्हय़ात यावर्षी घरगुती गणेशमूर्तींची संख्या 1 लाख 69 हजार 426 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळीं संख्या 126 झाली आहे. एकूण आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिह्यात यंदा 1 लाख 69 हजार 552 गणेशमूर्तींची घरोघरी, सार्वजनिक मंडळस्तरावर प्रतिष्ठापना होणार आहे. भक्तगणीं बाजारपेठांमध्ये मोठी रेलोल वाढली आहे, ाााकरमानी गावाकडे लाखांया संख्येने आले आहेत, अजूनही अनेकजण दाखल होणार आहेत.

गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येउ लागले आहेत. प्रत्येक गावामध्ये कुठे आरती….भजने…अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले जाखडी डबलबारी तर काही ठिकाणी भजनांचे जंगी डबलबारीचे सामने रंगणार आहेत. अनेक ठिकाणी घरगुती तसा सार्वजनिक मंडळांकडूनही चलचित्र देखावे साकारले जात आहेत. रत्नागिरीमध्ये श्री रत्नागिरीचा राजा, रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार, बंदर रोड मित्रमंडळ गणेशोत्सव, टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शांतिनगरचा राजा, उद्यमनगरचा राजा, तसेच सार्वजनिक बांधकाम, शासकीय रुग्णालय नगरपरिषद भूमिअभिलेख, पाटबंधारे, जिल्हा विशेष कारागृह अशा विविध कार्यालयांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची जोरदार लगबग सुरू आहे.