बापरे! रत्नागिरी तालुक्यात आणखी 29 पॉझिटिव्ह; थिबा पॅलेस परिसरात पुन्हा चार रुग्ण

रत्नागिरी:- रविवारी रात्री 23 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असताना सोमवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार एकट्या रत्नागिरी तालुक्यात 29 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या थिबा पॅलेस परिसरात पुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
 

सातत्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णसंख्येने रत्नागिरीकरांना चिंतेत टाकले आहे. शहर आणि लगतच्या परिसरात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण सापडून येत आहेत. सोमवारी दुपारी नव्याने 29 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात थिबा पॅलेस परिसरात पुन्हा चार रुग्ण सापडले आहेत. 
 

याशिवाय कुवारबावला 2, महिला वसतिगृह 2, मिरजोळे 1, सिविल ऍडमिट 2, परटवणे 1, जयगड 1, संगमेश्वर 1, लांजा 1, झाडगाव 1, गवळीवाडा 2, कीर्ती नगर 1, आंबेकोंड 1, कोतवडे बाजारपेठ 1, पेठकिल्ला 2, गोळप 1, गोळपसडा 3, धनाजीनाका 1 आणि अन्य एक असे 29 रुग्ण सापडून आले आहेत.