बापरे! जिल्ह्यात 24 तासात 94 कोरोना बाधित रुग्ण 

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 94 नवे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. 94 पैकी 77 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 17 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.  मागील काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून मंगळवारी जिल्ह्यात 94 नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,942 वर जाऊन पोहचली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात 77 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 17 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात आज 455 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 99,424 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात 60 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 075 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 92.07 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 376 इतकी आहे. 

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 96 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 35, दापोली 3, खेड 3, गुहागर 5, चिपळूण 32, मंडणगड 1, लांजा 2 आणि संगमेश्वर तालुक्यात 13 रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 9.91% आहे.