बाजार साखळी विकसित करण्यासाठी पणन मंडळाच्या चार खास योजना

रत्नागिरीः– भौगोलिक चिन्हांकन मानांकनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शेतमालाची विक्री व्यवस्था निर्यातीकरिता नोंदणी करावयाच्या संस्था व शेतकरी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी, बाजार साखळी विकसित करण्यासाठी कृषी पणन मंडळामार्फत चार योजना राबविण्यात येत आहेत.

भौगोलीक चिन्हांकन मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रचार व प्रसिध्दीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुदान योजना, भौगोलीक चिन्हांकन मानांकन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता नोंदणी शुल्कासाठी अनुदान योजना, भौगोलिक चिन्हांकन मानांकन नोंदणी प्राप्त उत्पादनांचे मुल्यसाखळी विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान योजना आणि कृषी पणन मंडळाच्या फळे व कृषिमाल महोत्सव उपक्रमामधील भौगोलिक चिन्हांकन मानांकन उत्पादनांच्या स्टॉल करिता अर्थसहाय्य योजना या चार योजनांचा समावेश आहे.