रत्नागिरी:- ‘लिफ फॉरवर्ड’ या राज्यस्तरीय संस्थेच्यावतीने रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बेस्ट स्कूल व तेथील प्राथमिक शिक्षिका आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन-मानवता विकास संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा घाग यांना बेस्ट टिचर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘लिफ फॉरवर्ड’ या राज्यस्तरीय संस्थे मार्फत जिल्हा परिषद शाळांसाठी इंग्लिश रिडींग उपकमाबाबत बसणी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गेले वर्षभर सहभागी करून घेण्यात आलेले होते. या संस्थेच्या रत्नागिरी सदस्या रेवती वैद्य व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता संस्थेच्या सौ. वर्षा घाग यांनी या उपकमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. त्या विद्यार्थ्यांची पालकांच्या मदतीने उत्तम तयारी करून घेतली. मुलांचा उत्तम सहभागाने त्यांच्या शैक्षणिक पगतीचा आलेख उंचावला. ही बाब पाहून बसणी पाथमिक शाळेला बेस्ट स्कूल व शिक्षिका सौ. वर्षा घाग यांना बेस्ट टिचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.