बसणी येथे विद्युतभारीत लाईन कारखाली

बसणी येथे विद्युतभारीत लाईन कारखाली

रत्नागिरी:- रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील बसणी येथे विद्युत भारीत लाईन तुटून गाडी खाली आली.यावेळी याच मार्गावरुन जाणारे भारत राष्ट्र समिती पक्षाचे मिडियाचे कोकण समन्वय गुरुप्रसाद सावंत यांनी समयसुचकता दाखवून वाहतूक थांबवत महावितरणला वीज पुरवठा खंडीत करण्याची सुचना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. गुरुप्रसाद सावंत यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

शनिवारी दुपारी गुरुप्रसाद सावंत हे आपल्या पक्षाच्या कामासाठी बसणी येथून जात होते. यावेळी अचानक मुख्य वीज वाहिनीवरील विद्युतभारीत लाईन अचानक तुटून पडली. यावळी याच मार्गावरून जाणार्‍या कारच्या खाली आली. त्या कार चालकांनेही तात्काळ कार थांबविली. विद्युतभारीत लाईन मुख्य रस्त्यावर पडल्याचे लक्षात येताच गुरुप्रसाद सावंत यांनी समयसुचकता दाखवत प्रथम दोन्ही बाजूने येणारी वाहतूक थांबविली.

त्यानंतर महावितरणशी संपर्क करुन वीज पुरवठा खंडीत करण्याची सुचना दिली. महावितरणने तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर महावितरणच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी येवून विद्युतभारीत लाईन बाजूला करुन मार्ग वाहतुकीला मोकळा करुन दिला. मात्र भारत राष्ट्र समिती पक्षाचे मिडियाचे कोकण समन्वय गुरुप्रसाद सावंत यांनी समयसुचकता दाखवून केलेल्या कामाचे सर्वांनीच कौतूक केले आहे.