रत्नागिरी:- शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना बर्डफ्लूची लागण झाली. आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्या आहेत. या घटनेची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने वेगळ्या करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हा व्हायरस कसा आला याची शास्त्रिय माहिती घेऊन भविष्यात येणार नाहीत, यासाठी प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील तरूण पोल्ट्री व्यवसायाकडे वळला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत करणारा हा उद्योग आहे. या व्यवसायाला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे, असे मत राज्याचे पुनर्वसन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. केदार म्हणाले, काल शहापूर येथे तीनशे कोंबड्या दगावल्या आहे. या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची टीम पोहचली आहे. त्यांनी तपासणी सुरु केली आहे. सुमारे एक किमीचा परिसर सील करण्यात आला आहे. या व्हायरसचे नमुने घेतेले असू नते तपसाणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल आज संध्याकाळपर्यंत मिळेल. मात्र बर्डफ्ल्युचा फैलाव होऊ नये, याची पुर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित टीमला देण्यात आल्या आहेत. काही काळात इतक्या तातडीने हा व्हायरस कसा आला याची माहिती घेऊ याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रशासन नियम आणि ठरेलेल्या निकषांचे योग्य पालन करण्यात आले आहे. तुम्हाला विश्वास देतो हा व्हायरस वाढणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे.
बर्ड फ्ल्युमुळे ज्या पोल्ट्री व्यवसायिकाचे नुकसान झाले आहे, त्याला शासनाच्या निकषा प्रमाणे मदतीची भुमिका शासनाची आहे. व्हायरस भविष्यात येणार नाहीत, त्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला सांभाळण्याची जबाबदारी शासनाची आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणारा हा उद्योग आहे. अलिकडे तरूण मुले मोठ्या प्रमाणात स्वयंमरोजगार म्हणून या उद्योगाकडे वळू लागले आहेत. ही अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी शासनाची आहे. पक्षी २४ तासही जगत नाहीत, अशी परिस्थिती होते. राज्याला आणि उद्योगांना हे परवडणारे नाही आणि खबरदारी म्हणून एक किमी अंतरावरील पक्षी मारण्याच्या सूचना दिल्या आहेत.









