रत्नागिरी:- फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार पुढे आला आहे. यापकरणी रत्नागिरीतील जागरूक देशप्रेमी नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलिसांकडे धाव घेउन संबधित तरूणावर योग्य ती कडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक कॅबिनेटमंत्री नबाब मलिक यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी अमृता फडणवीस यांचे म्युझिक अल्बमचे फायनान्स हेडबाबत पोस्ट शेयर केली होती. त्यावर रत्नागिरीतील दर्शन राजेंद्र जैन (रा. थिबापॅलेस) यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरून आपले उत्तर पोस्ट केले असल्याचे म्हणणे आहे. एखादी व्यक्ती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांबाबत अर्वाच्य भाष्य करतो. त्यावेळी त्याचेवर गुन्हा दाखल करून सर्वांसाठी कायदा समान याची चुणूक महाराष्ट्र पोलिसंनी यापूर्वी देखील दाखवून दिली आहे. त्यामुळे दर्शन जैन यांने वापरलेली भाषा ही सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. एवाद्या अल्पसंख्यांक धर्माची जी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेटमंत्र्याचे पद भूषवित आहे. त्यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांमुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या या आक्षेपार्ह पोस्टबद्दल जैन यांच्यावर अनुचित प्रकार घडू नये याकरता वेळीच कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशप्रेमी जागरूक नागरिक अल्ताफ संगमेश्वरी, फैय्याज मुकादम, फैसल मुल्ला, साहिल पठाण, मुजफ्फर मुकादम, फरहान मुल्ला, नदाफ काझी, कझिम शेख, सुहेल लाला, फहिम खडकवाला, मोहसिन शहा, आसिफ अकबानी, अँड. अल्तमश झारी, फरहान काद्री, सुभान तांबोळी यांनी केली आहे.









