फिनेल प्राशन केलेला कोकणनगर येथील तरुण रुग्णालयात

रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर येथील तरुणाने अज्ञात कारणातून फिनेल प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरमान करीम खान (वय २४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे फिनेल प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २४) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.  

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरमान खान याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने फिनेल प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.