रत्नागिरी:- भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी वेदना स्मृती दिन अर्थात विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून देशभरात पाळला जातो. या फाळणीच्या वेळची परिस्थिती रत्नागिरीकरांना छायाचित्राच्या माध्यमातून अनुभवयास मिळावी यासाठी रत्नागिरी शहरातील माळनाका येथील गांधी पेट्रोल पंपामध्ये प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचा शुभारंभ निवृत्त कर्नल शशिकांत सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसह विद्यार्थ्यांना पहाण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. १४ आगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांनी भारताचे विभाजन करत पाकिस्तानची निार्मिती केली. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण फाळणीच्या काही दिवस आधी आणि त्यानंतरही भारत-पाकिस्तान सीमेवरील नागरिकांना त्या भिषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. फाळणीनंतर झालेल्या दंगलीत अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, कित्येकजणं बेघर झाले. फाळणीचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांनाही बसला. फाळणीमुणे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली. त्यावेळी विविध वृत्तपत्रांमध्ये छायाचित्रासह वार्ताकन करण्यात आले होते. त्यावेळच्या कात्रणांचे संकलन करण्यात आले होते. ती कात्रण प्रदर्शनाच्या माध्यमातून रत्नागिकरांना पहावयास मिळावीत यासाठी एचपीसीएलने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाच्या शुभारंभाला प्रसिद्ध उद्योजक दिपकशेठ गर्दे, पेट्रोल पंप संघटनेचे अध्यक्ष उदय लोध, जयप्रकाश गांधी, एचपीसीएलचे सेल मनेजर रोहित कटियार, पत्रकार राजेंद्र चव्हाण, राजेश चव्हाण, राजेश कळंबटे, मकरंद पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.