फाडलेले बॅनर अवघ्या काही मिनिटांत झळकले 

रत्नागिरी:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा रत्नागिरीत दाखल होण्यापूर्वी मारुती मंदिर सर्कल येथील बॅनर फाडण्यात आले होते. परंतु काही मिनीटांतच भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नवे बॅनर त्याच ठिकाणी पुन्हा झळकावले. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा दुपारी तीनच्या दरम्यान रत्नागिरीत दाखल होणार आहेत. सर्व नियोजित कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी दाखल झाले आहेत.