रत्नागिरी:- रत्नागिरीतील फणसोप ग्रामपंचायतीवर देखील उद्धव ठाकरे यांच्या सेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मत मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मत मिळाली. राधिका साळवी या ३६४ मतांनी विजयी झाल्या.
ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली. फणसोपमध्ये दोन वॉर्डात राकेश साळवी, अक्षया पराग साळवी, रितेश रविंद्र साळवी, रेणुका राजेंद्र आग्रे, साक्षी चौगुले हे पाच उमेदवार विजयी झाले. यातील राकेश साळवी हे शिंदे गटाचे असून उर्वरीत चारही विजयी उमेदवार या ठाकरे गटाच्या आहेत.









