रत्नागिरी:- ब्लड प्रेशर असलेल्या महिलेने प्रेशरच्या गोळ्या घेऊन झोपली अचानक तिच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. गौरी शामराव गोसावी (५५, रा. आठवडाबाजार, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २७) रात्री पावणेबाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोसावी यांना ब्लड प्रेशरचा आजार होता. गोळ्या घेऊन त्या झोपल्या असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.