प्रेम म्हणजे काय असतं? या चित्रपटाचे कलाकार उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी:- मराठी मातीतील अस्सल कलाकारांचा एक नवीन चित्रपट दिनांक 4 नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोय आणि त्यातील सर्व कलाकार रत्नागिरी महोत्सवला 1 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता भेट देत आहेत.

प्रेम म्हणजे काय असतं? हा चित्रपट दिनांक 4 नोव्हेंबर रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त चंपक मैदान रत्नागिरी येथे आयोजित रत्नागिरी महोत्सवला उद्या 1 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता आपली हजेरी लावणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच सुपर मॉम डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपली हजेरी लावावी असे आवाहन किरण डान्स अकॅडमी यांनी केले आहे.