रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीत 16 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवत महापरिवर्तन पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले. महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.
रविवारी (ता. 5) पतपेढीच्या सभागृहात मतमोजणी झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सुधीर कांबळे यांनी काम पाहिले. शनिवारी झालेल्या मतदानावेळी 5 हजार 256 पैकी 5 हजार 030 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होईल अशी शक्यता होती. 16 जागांसाठी 32 उमेदवार रिंगणात होता. सत्ताधारी महायुतीविरुध्द महापरिवर्तन अशी सरळ लढत होती. यामध्ये महापरिवर्तन पॅनलने सत्ताधार्यांना धक्का देत विजय मिळवला. महापरिवर्तनकडून मनेश शिंदे (मंडणगड), राजेंद्र चांदिवडे (खेड), अरविंद पालकर (गुहागर), चंद्रकांत कोकरे (रत्नागिरी), संतोष कदम (इतर मागास प्रभाग), संतोष कांबळे (अनिसूचित जमाती), अंकुष चांगण (भटक्या जमाती), गुलजार डोंगरकर (महिला राखीव), चंद्रकांत झगडे (सर्वसाधारण) या नऊ संचालकांचा समावेश आहे. महायुती पॅनलला 7 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये अशोक मळेकर (दापोली), अमोल भोबस्कर (चिपळूण), रमेश गोताड (संगमेश्वर), संजय डांगे (लांजा), विजय खांडेकर (राजापूर), प्रांजल धामापूरकर (महिला राखीव), सुनिल दळवी (सर्वसाधारण) यांचा समावेश आहे.









