रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. पांडुरंग कांबळे यांचे बुधवारी पहाटे दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यातून ते बरे झाल्याचा मेसेज देखील त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला होता. बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले.
काही दिवसांपूर्वी डॉ. कांबळे यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर काही दिवस ते होम आयसोलाशनमध्ये होते. अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. कोरोनावर मात करून डॉ. कांबळे रत्नागिरीत परतले होते. याबाबतचा संदेश त्यांनी सोशल मीडियावरून दिला होता.
बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर कांबळे रत्नागिरी येथील अतिशय चांगले व गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने रत्नागिरीकरांनी एक चांगला डॉक्टर गमावल्याची प्रतिक्रिया रत्नागिरीकरांमधून उमटत आहे.