दुसऱ्या दिवशी १ हजार ८१२ फेऱ्यांमधून ६० हजार जणांचा प्रवास
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील जनतेचा अजूनही एसटीवर तेवढाच विश्वास असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (ता. १८) एका दिवसात ७२ हजार प्रवाशांची वाहतूक झाली होती. आज दुसऱ्या दिवशी ३५० गाड्यांच्या १ हजार ८१२ फेऱ्यांद्वारे ६० हजार प्रवाशांची एसटीने प्रवास केला. कमी कालावधीत एसटीकडे प्रवासी वर्ग वळू लागला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत सोमवारी (ता. १८) पासून कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी १२८८ फेऱ्या विभागातून सोडण्यात आल्या. बुधवारी सर्व विभागातील ३५७ कर्मचारी हजर झाले. बुधवारी एसटी विभागाच्या जिल्ह्यात ३५० गाड्यांच्या १ हजार ८१२ फेऱ्या झाल्या. या फेऱ्याद्वारे ६० हजार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केल्याचे एसटी विभागाने स्पष्ट केले. हे प्रमाण नियमित वाहतुकीच्या तुलनेत समाधानकारक आहे. कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या बंद नंतरची दोन दिवसात ३० ते ४० टक्के प्रवासी एसटीकडे वळला आहे.