प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्याला 48 कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वंचित लाभार्थ्यांना 48 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारा दुसरा व तिसरा हप्ता देण्यात येणार आहे.

या योजनेत जिल्ह्यात 129 लाभार्थी असून, 120 प्रस्तावांना निधीची प्रतीक्षा होती. या आर्थिक वर्षापूर्वी हा निधी मिळाल्याने आता लाभार्थी आणि प्रस्तावित लाभार्थी यांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरांसाठी बांधकाम परवानगी देण्यात आली.