प्रत्येक तालुक्यात 75 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी:- भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी तसेच गाव व वाड्याजवळ नवीन जलस्त्रोत निर्माण व्हावा, या उद्देशातून रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत प्रत्येकी 75 वनराई बंधारे बांधण्याचाउद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी, महसूल आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी डोंगर-खोर्‍यातून वाहणारे पावसाचे पाणी दगड, वाळूच्या पिशव्यांनी अडविताना लोकसहभाग ही घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई नेहमीची  झाली आहे. मार्च नंतर बहुतांशी गावांमध्ये पाणी टंचाई सुरू होते. हे पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी कृषी आणि प्रशासनाच्या पुढाकारानेगाव, वाड्या परिसरात वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  प्रत्येक तालुक्यात बंधार्‍यांची पंच्याहत्तरी गाठली जाणार आहे. या उपक्रमात कृषी विभागाचे कर्मचारी, स्थानिक बचत गट महिला सदस्या, ग्रामसेवक, स्थानिक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांना सहभाग घेतला जणार आहे.
पाण्याचे महत्व लोकांना समजावे यासाठी गाव पातळीवर जलसंवर्धन अन्य उपक्रम लवकरच हाती घेतले जाणार आहे. नागरिकांना पाण्याचे महत्व कळावे. वाढत्या उपशामुळे भूजल पातळी कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा किती वापर केले पाहिजे याचाही विचार या निमित्ताने केला जाईल. हा उद्देशातून वनराई बंधारे उपक्रम हाती घेतले जाणार आहे. भूजल पातळी बरोबर गोधन, जंगली प्राण्यांना पिण्यासाठी जंगलात पाण्याचे साधन तयार व्हावे. जमिनीची धूप रोखणे आणि बंधारा परिसरात नवीन झाडांची लागवड करण्याचे उपक्रम राबविले जाणार आहेत.