नोकरीवर रूजू ; कर्मचाऱ्यांवरील ताण कमी
रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलाने २०१९ मधील पोलिस भरतीतील २१ उमेदवारांना नवीन वर्षांची भेट दिली. या उमेदवारांना १ जानेवारी २०२२ ला पोलिस दलात भरती करून घेतले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि त्यांच्या टीमने या उमेदवारांना ही भेट दिली.
जिल्हा पोलिस दलाकडून ६३ पोलिस शिपाई व ३ बॅन्डमन या ६६ पदांसाठी भरती करण्यात आली होती. २०१९ मधील ही भरती होती. त्यापैकी २२ उमेदवारांना १ जानोवारी २०२२ ला हजर करून घेण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा क्षण येतो. शाळेचा पहिला दिवस असो किंवा नोकरीचा पहिला दिवस तो सर्वांसाठी आनंदचा असतो. त्यातही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर नोकरीवर हजर होण्याचे आदेश मिळाले तर आनंद द्विगुणित होतो. हाच आनंदाचा क्षण पोलिस दलात नव्याने भरती झालेल्या २१ जणांना अनुभवायला मिळाला. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग व त्यांच्या टीमने उमेदवाराना नवीन वर्षाची अनोखी भेट दिली.
जिल्हा पोलिस दलामध्ये ६६ पदांसाठी ३ सप्टेंबर २०१९ ला जाहिरात देण्यात आली होती. त्यानंतर १८ सप्टेंबरा २०२१ ला लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ३ हजार ७१४ उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यापैकी २१ पुरूष व १० महिलांना १ जानेवारी २०२२ ला हजर होण्याचे आदेश पोलिस विभागाकडून देण्यात आले होते. या आदेशानंतर ते कर्मचारी नवीन वर्षाच्या पहिल्यात दिवशी हजर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसांवरील थोडा तरी ताण कमी होण्यास मदत होणार आहे.