पोलीस भरतीसाठी ६३० उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलातील ६६ रिक्त पदासाठी  भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी काल २१ केंद्रांवर ७ हजार ७६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ७१४ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. गुणपत्रीकांची तपासणी झाल्यानंतर त्यापैकी ६३० उमेदवार पुढील मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले आहे. त्याची तारीख लवकच जाहीर केली जाणार आहे.  

जिल्हा पोलिस दलामध्ये २०१९ मधील भरती आता घेण्यात येत आहे. एकूण ६६ जागांमध्ये पोलिस शिपाई, चालक  आणि बॅन्ड्समन या पदांचा समावेश होता. विशेष म्हणजे बॅन्ड्मनच्या ३ जागांसाठी तब्बल ५ हजार अर्ज आले होते. त्याची प्रक्रिया यापूर्वीच पुर्ण झाली. आता शिपाई आणि चालक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. यासाठी २१ केंद्र तयार करून ७ हजार ७६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. काल चोख पोलिस बंदोबस्तामध्ये एजन्सीद्वारे ही प्रक्रिया झाली. त्यापैकी परीक्षेला ३ हजार ७१४ उमेदवार उपस्थित राहिल्याचे परीक्षेअंती लक्षात आले. परीक्षेनंतर गुणपत्रीकेची तपासणी करण्यात आली. परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी ६३० उमेदवार चांगल्या गुणाने उत्तीण झाले आहेत. ते आता मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरले असून लवकरच त्याची तारीख जाहिर केली जाणार आहे.