मिरवणुकीतून कोरोना योध्द्यांना सलाम
रत्नागिरी:- कोरोना महामारीत काम करणार्या योध्द्यांना सलाम करणारी आगळीवेगळी मिरवणुक रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथे हातीसकर बंधूनी काढली. पोलीस, पीपीई किट घातलेले वैद्यकीय अधिकारी, नर्सची वेषभुषा करणार्यांचा समावेश केला होता. त्यांचा सन्मान करताना ‘तिसरी लाट येऊ दे नको’ असं साकडं घालणारा फलकही लावण्यात आला होता.
कोरोनातील तिसर्या लाटेच्या प्रभावात यंदाचा गणेशोत्सव भक्तांनी उत्साहात साजरा केला. कोरोनाच्या भितीमध्ये न राहता गणेशभक्तांनी आनंदोत्सवात पुजा-अर्चा केली. घराघरात कोरोनाचे देखावेही तयार करण्यात आले होते. आगमनाबरोबरच विसर्जनावेळी गणशेभक्तंचा उत्साह कायम होता. गौरी सोबत मंगळवारी (ता. 14) पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. बसणी येथील मिरवणूक लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीत चक्क कोरोना योद्धये पाहायला मिळाले. बसणीतल्या हातिसकर बंधूंनी ही अनोखी शक्कल वापरली. या मिरवणुकीत कोरोना योध्दयांचा देखावा होता. ‘मीच माझा रक्षक’ या थीमचा वापर करण्यात आला होता. डॉक्टर, नर्स, पोलीस असे हे यौध्दे प्रतिकात्मक म्हणून उभे केलेले होते. गेली कित्तेक वर्ष गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत च्या दरम्यान असे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात.