पेट्रोल १२० तर डिझेल १०४ रुपये लिटर; महागाईने सर्वसामान्य मेटाकुटीला

रत्नागिरी:-गेल्या पंधरा दिवसांमध्ये अकरा ते बारा वेळा इंधन दरवाढ झाल्याने वाहनधारकासह सर्वसामान्य महागाईच्या खाईत लोटले जात आहेत. पु्न्हा इंधन दरवाढ झाल्याने जिल्ह्यात पेट्रोल आज १२० रुपये तर पॉवर पेट्रोल १२७ रुपये लिटर झाले आहे. तोच डिझेलचा दर  १०४ रुपये लिटर झाला आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर भडकत असल्याने त्याचा मोठा परिणाम एलपीजी गॅस सिलिंडर, दुध आणि भाज्यांसह दैनंदिन जीवनसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीमध्ये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चातेलाचे दर आणि युद्धाचा मोठा परिणाम यावर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पेट्रो आणि डिझेलमध्ये १२ वेळा ५० पैसे ते ८० पैशांपर्यंत झाली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून सामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. सगळ्यात जास्त दर रत्नागिरीमध्ये असल्याने आहे. तर सगळ्यात जास्त महागाई  रत्नागिरी आहे.

आधीच कोरोनाच्या संकटात लोक भरडले गेले आहेत. त्यात हे इंधन दरवाढ आणि महागाईचे दुसरे संकट उंभरट्यावर आहे. आता वाहने चालवावी कि नको, असा प्रश्न वाहनधारकांवर आला आहे. महिन्याचे आर्थिक गणित विस्कटु लागले आहे. महागाईच्या या भस्मासुराला लवकरात लवकर रोखुन सर्वसामान्यांना केंद्र शासनाने दिलासा द्यावा इशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

इंधन दरवाढीबाबत सर्व नागरिकांच्या वतीनी मी बोलतो, गेली बारा दिवस इंधन दरवाढ झाली आहे आणि आता ती स्थिर राहतील याची शक्यता नाही. पुन्हा भावाढ होणार आहे. यामुळे सर्वसामान्या कुटुंबाचे संपुर्ण आर्थिक गणित कोलमडले असून त्याच्या खिशाला महागाईची चाट बसु लागली आहे. शासन कोणाचेही असो पण त्यांनी कर कमी केले पाहिजत. इंधन दरवाढीचा परिणाम भाजी पाल्यापासून सर्व गोष्टीवर झाला आहे. काही दिवसांपुर्वी ३० त३२ रुपय किलो असणारा गहु आता ३६ रुपयावर गेला आहे. दरवाढीमुळे सर्वसमान्यांची हेळसांडा  होत आहे. शासनाने याचा डोळसपणे विचार करावा, लवकर तोडगा काढुन इंधन दरवाढ कमी करावी. इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय निघाला असलात तरी त्याला पुरेशी चार्जींग स्टेशन नाहीत ती उभारली पाहिजे. त्या वाहनांच्या किमती कमी असल्या पाहिेजेत, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीतील वाहनधारक सखाराम जाधव यांनी दिली.