पूर्णगड किल्ल्याची लोकसहभागातून दुरुस्ती

रत्नागिरीः–  कोकणातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबरच स्वच्छता, देखभाल, दुरुस्तीसाठी पुण्यातील उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक संस्था दायित्व योजनेअंतर्गत रत्नागिरीतील पूर्णगड किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी प्रसिद्ध व्यावसायिक नुरमहंमद सदुद्दीन सय्यद यांनी घेतली आहे.लोकसहभाग राबविण्यात येत असलेला राज्यातील पाचवा प्रकल्प ठरला आहे.  

सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील बहुतांश दुर्ग‚किल्ले समुद्र किनारपट्टीलगत असून येथील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक व पर्यटनदृष्टया महत्त्व आहे.शिवरायांच्या पराक्रमाच्या स्मृती म्हणजेच दुर्ग‚किल्ले आज  ऐतिहासिक ठेवा म्हणूनच जतन केल्या जात असुन, याच गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी व संवर्धनासाठी राज्य पुरातत्त्व व वस्तू संगÏहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांचे विशेष मार्गदर्शनाखाली पुरातत्त्वचे सहाय्यक संचालक  विलास वाहणे यांनी धडक मोहीम घेतली आहे. दापोली तालुक्यातील हर्णे किल्ल्यानंतर पुर्णगड किल्लाचीहि देखभाल दुरुस्ती होणार आहे.सेवाभावी संस्था व उद्योजकांचे सहकार्य घेऊन गडकिल्यांची नियमीत स्वच्छता व परिक्षणासाठी राज्य पुरातत्त्व विभागामार्फत  सामाजिक संस्था दायित्व अंतर्गत किल्ल्यांची स्वच्छता व देखभालीसाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन धोरणानुसार पश्चिम महाराष्ट्रानंतर आता तळ कोकणातल्या गडकोटांचीही देखभाल होणार आहे. त्यासाठी शिवप्रेमी उद्योजक व सेवाभावी संस्था देखील स्वता:हुन पुढे येऊ लागल्या असून राजापूर तालुक्यातील किल्ले पूर्णगडाचे देखभालीसाठी खडकवासला ता. हवेली (पुणे ) येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक नुरमहंमद सदुद्दीन सय्यद दानशुर व्यक्तीमत्व पुढे आले आहे. पुरातत्व विभागाचे धोरणानुसार पुर्णगडाची दैनंदिन स्वच्छता, देखभाल व परिक्षणाची जबाबदारी श्री.नुरमहंमद सय्यद यांनी स्विकारल्याने अशा प्रकारे देखभाल होणारा पुर्णगड राज्यातील पाचवा किल्ला ठरला आहे.

रत्नागिरी जिल्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे. राजापुर तालुक्यातील पूर्णगड गावाच्या हद्दीतच हा जलदुर्ग असुन रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्रेक्षणिय स्थUांपैकी एक असलेला किल्ला आहे. धार्मिक स्थळ म्हणुन ओळखल्या जाणार्या पावसपासुन साधारण १० ते ११ कि. मी.अंतरावर समुद्रकिनारीच पूर्णगड किल्ला आहे.