काम अंतिम टप्प्यात; लवकरच पर्यटकांसाठी खुला होणार
रत्नागिरी:- शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये आहे. त्यापैकी एक म्हणजे पुर्णगडचा किल्ला. पडझडीमुळे या किल्ल्याचे मुळ स्वरुपच लोप पावत चालेल होते. मात्र हा किल्ला राज्य संरक्षित झाला आणि किल्ल्याचे रुपडेच पालटुन टाकले. सुमारे 4 कोटी 91 लाख रुपये खर्च करून मुळ रुपात त्याचे जतन केले जात आहे. दर्जेदार कामामुळे या किल्ल्याची टापच वेगळी दिसु लागली आहे. अंतिम टप्प्यात असलेले हे काम डिसेंबर अखेर पुर्ण होणार आहे. त्यानंतर किल्ला पर्यटनासाठी खुला होणार आहे.
ऐतिहासिक घटनांचे मनात काहूर माजविणारे आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोचविण्याची ताकत ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये आहे. त्यानिमित्ताने या प्राचीन वास्तूंच्या आणि त्यावेळी चालणार्या व्यापार, युद्धबळाच्या पुसट खानाखूनांबात आजही आहेत. रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड किल्ला त्यापैकी एक आहे. मात्र या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. तो राज्यसंरक्षित झाल्यानंतर या किल्ल्याची मुळस्वरुपात डागडुजी करण्याचा निर्णय झाला. पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय विभागाच्या प्रस्तावाला मंजूरी मिळून 4 कोटी 91 लाख रुपये मंजूर झाले. लातुरच्या साई प्रेम कन्स्ट्रक्शन कंपनीला त्याचा ठेका दिला. या कंपनीने आतापर्यंत 4 कोटी 50 लाख रुपये खर्च केले आहेत.
किल्ल्याच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पडझड झालेल्या भिंती बांधुन घेतल्या आहेत. मधे काही भाग कोसळला होता. त्याची दुरूस्ती आणि ढासळलेला पाय दुरूस्त केला आहे. तटबंधीचे काम पुर्ण झाले असून त्यावर वॉकिंग ट्रॅक तयार केला आहे. बाहेरच्या भिंतींनी दरवाज्याला टचप केले आहे. पडलेला भागही दुरूस्त केला आहे. आता फिनिशिंग सुरू आहे. अंतिम टप्प्यातील हे काम असून डिसेंबरनंतर हा किल्ला पर्यटानासाठी खुला केला जाणार आहे. तसेच पुर्णगड- गोवा किल्ला (दापोली) या किल्ल्यांची देखभालीसाठी पुर्णवेळ दोन कर्मचारी मिळाले आहेत. त्यामुळे किल्यांची चांगली देखभार होणार आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहणे यांनी दिली.