पुरवठा विभागाची वेबसाईट बंद; हजारो शिधापत्रिकांचे प्रस्ताव धूळखात पडून 

रत्नागिरी:- धान्य वितरणासह शिधापत्रिका वाटपात सुसुत्रता येण्यासाठी राज्य सरकारने पुरवठा विभागाचा कारभार ऑनलाईन केला आहे. मात्र डिसेंबर महिन्यापासून तब्बल सहा महिने राज्य पुरवठा विभागाची वेबसाईट बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिका धारकांना बसला आहे. रत्नागिरी तालुक्यात 1 हजार शिधापत्रिकांचे प्रस्ताव तहसिलदार कार्यालयात पडून आहेत. तर ज्या शिधापत्रिका अपडेट करण्यासाठी सादर करण्यात आल्या आहेत. अशा ग्राहकांना सहा महिने धान्याविना रहावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्य सरकारने  प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची माहिती आनलाईन केली आहे. ती माहिती पास मशिनला कनेक्ट केल्यामुळे थम दिल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण केले जाते. मात्र शिधापत्रिकेची माहिती अपडेट नसेल तर त्यांना धान्य दिले जात नाही. रत्नागिरी तालुक्यातील सुमारे 500 हून अधिक शिधापत्रिकाधारकांनी आपल्या शिधापत्रिका अपडेट करण्यासाठी तहसिलदार कार्यालयात दिल्या आहे. मात्र माहिती अपडेट होणारी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाची वेबसाईट डिसेंबर माहिन्यापासून तब्बल सहा महिने बंद आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून अपडेटसाठी आलेल्या शिधापात्रिकांचे प्रस्ताव तहसिलदार कार्यालयात पडून आहेत.  तर शिधापत्रिका नसल्याने ग्राहकांना धान्य दुकानातून धान्य देण्यात येत नाही. रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्या अशा सुमारे पाचशे कुटुंबियांवर उपासमारीची वेण आली आहे. दररोज तहसिलदार कार्यालयाच्या येवूनही त्यांना वेबसाईट बंद असल्याने मागारी फिरावे लागत असून यामध्ये वयोवृद्ध ग्राहकांचा सर्वाधिक समावेश आहे. तर  नव्या रेशन कार्डसाठीही सुमारे 500 प्रस्ताव याच कारणामुळे प्रलंबित राहिले आहे. जिल्हाधिकार्यांसह जिल्हा पुरवठा विभागाने याकडे लक्ष देवून वेबसाईट सुरणीत होण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न करण्याच्या मागणी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे.